तळेगाव, (प्रतिनिधी): यावर्षी पावसाचा दीर्घ खंड पडल्याने खरीप पिके हातची गेली आहेत. कापूस, मका, तूर, सोयाबीन, मूग, उडीद यासारखी पिके पावसाअभावी नष्ट झाली. या संकट काळात महायुती सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याची ग्वाही आमदार सुहास शिरसाठ यांनी दिली. तळेगाव येथे शेतकऱ्यांच्या बांधावर जात आमदार शिरसाठ यांनी दुष्काळग्रस्त भागातील पिकांची पाहणी केली.
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य कैलास गव्हाड, जगन गव्हाड, युवराज गव्हाड, कृष्णा फलके, गणेश फलके, विष्णू
गव्हाड, संतोष गव्हाड यांच्यासह ग्रामस्थांची उपस्थिती होती. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर आमदार सुहास शिरसाठ यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर पिकांची पाहणी केली तसेच शेतकऱ्यांची संवाद साधला. तळेगाव येथे सार्वजनिक गणेश मंडळाची आरती करत आमदार शिरसाठ यांनी ग्रामस्थांना संबोधित केल. तसेच माजी जिल्हा परिषद सदस्य कैलास गव्हाड यांच्यासह शेतकऱ्यांच्या बांधावर जात पिकांची पाहणी केली.
ते म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार हे दुष्काळग्रस्त
भागाची पाहणी करीत आहेत. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांचे सांत्वन करीत आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांनी तातडीने दुष्काळ जाहीर केला असून दुष्काळा संबंधीच्या सर्व तरतुदी लागू केल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना नक्कीच दिलासा मिळेल. महायुती सरकार खंबीरपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. तर जिल्हा परिषद सदस्य माजी जिल्हा परिषद सदस्य कैलास गव्हाड यांनी शेतकरी अडचणीत आहेत. सरकार त्यांच्या पाठीशी नक्कीच उभे राहील, असे सांगितले.













